Saturday, 18 April 2026

मासूम’ प्रकल्पाचा विस्तार करताना अधीक्षक, बालकल्याण समिती आणि किशोर न्याय

 प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्षमता विकास. बालकल्याण समिती सदस्यजिल्हा बाल संरक्षण युनिट अधिकारी तसेच बालसंगोपन संस्थांतील कर्मचारी यांना मानसिक आरोग्यसंवाद कौशल्ये आणि समस्या ओळखण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे मुलांसाठी अधिक सुरक्षितसंवेदनशील आणि समर्थ वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

 

नवीन करारानुसार मासूम’ प्रकल्पाचा विस्तार करताना अधीक्षकबालकल्याण समिती आणि किशोर न्याय मंडळ यांच्याशी समन्वय साधून प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार योग्य सेवा मिळेल याची काळजी घेतली जाणार आहे. प्रकल्पाच्या प्रगतीविषयी मासिक व तिमाही अहवाल महिला व बाल विकास विभागास सादर करण्यात येणार आहेत.

 

मासूम’ प्रकल्प हा सार्वजनिक-खासगी भागीदारीचा एक प्रभावी नमुना ठरत असूनकेवळ मानसिक आघातावर मात करण्यापुरता मर्यादित न राहता मुलांमध्ये आत्मविश्वासभावनिक सक्षमता आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi