राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
नागपूर, दि. १७ : पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी लोकभवन, नागपूर येथे अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रकल्पाची क्षमता ९० किलोवॅट असून त्यातून दरवर्षी सुमारे १,१५,२०० युनिट्स स्वच्छ वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे.
सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करताना राज्यपालांनी हरित ऊर्जा हीच भविष्याची गरज असून अशा प्रकल्पांमुळे केवळ पर्यावरणाचे संरक्षण होत नाही, तर ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठीही मोठी मदत होते, असे सांगितले.
No comments:
Post a Comment