Tuesday, 24 March 2026

निरा देवधर प्रकल्पातून ४३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

 निरा देवधर प्रकल्पातून ४३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

 - जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई,दि.२३ :  निरा देवधर प्रकल्पामुळे भोरखंडाळाफलटण आणि माळशिरस या चार तालुक्यांतील एकूण ४३,०५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार  आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.

आमदार उत्तमराव जानकर यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती.

मंत्री डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले कीनिरा देवधर आणि गुंजवणी धरणाचे कालवे पूर्ण होईपर्यंत समन्यायी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात पाणी वाटप मंजूर करण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील १६ दुष्काळग्रस्त गावांसाठी सहकारी उपसा सिंचन योजनेऐवजी आता शासकीय उपसा सिंचन योजना राबवण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार याला मंजुरी मिळाली असूनसध्या या कामाचे सर्वेक्षण क्षेत्रीय स्तरावर प्रगतीपथावर आहे. लवकरच याचा समावेश सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालात केला जाईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi