Tuesday, 24 March 2026

गुंजवणी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद पूर्णतः खर्च करण्यात आली

 मंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले कीनिरा देवधर मुख्य कालव्याचे १ ते ६५ कि.मी. पर्यंतचे काम पारंपारिक पद्धतीने पूर्ण झाले असून २०१६-१७ पासून नियमित पाणी सोडले जात आहे. उर्वरित ६५ ते १३५ कि.मी. चे काम 'बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे करण्याचे नियोजन असून ते प्रगतीपथावर आहे.या कामांसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये निरा देवधर प्रकल्पासाठी २७४ कोटी रुपयांची तरतूद असून १९६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. गुंजवणी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद पूर्णतः खर्च करण्यात आली आहे.या प्रकल्पामुळे दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईलअसा विश्वास  मंत्री डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi