Tuesday, 24 March 2026

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार

 अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाईतीन महिन्यांत

सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार

– महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि.२३ : भिवंडी परिसरासह रायगडपालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदा खनिज उत्खनन व तस्करीविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे.  पुढील तीन महिन्यांत मागील पाच वर्षांतील परवानग्यांची चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर दंडव्याज आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईलअशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

 

भिवंडी व परिसरात तसेच रायगडपालघर जिल्ह्यात बेकायदा खनिज उत्खनन व तस्करीमुळे शासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत तत्काळ चौकशी व कारवाईच्या मागणीबाबत विधासभेत सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली.  या चर्चेत सदस्य दिलीप लांडेराजू खरेनाना पटोले यांनी सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi