वणीच्या सर्वांगीण विकासासाठी टीपी योजनेतून मोठ्या प्रमाणात
पायाभूत सुविधा उपलब्ध होणार
- राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि.२३ : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहराचे झपाट्याने वाढ होत आहे. वणी शहराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास साधण्यासाठी टाउन प्लॅनिंग (टीपी) योजना प्रभावी ठरत आहे. या माध्यमातून पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उभारल्या जात असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
या अनुषंगाने सदस्य संजय देरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सदस्य राजेश पवार यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले की, टीपी योजनेद्वारे रस्ते, दवाखाने, बगीचे, मैदाने, ईडब्ल्यूएस गृहनिर्माण आदींसाठी आवश्यक जागा उपलब्ध होत असून नगरपरिषदेला विनामूल्य क्षेत्रही मिळाले आहे. टीपी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून वणी नगरपरिषदेस विशेष साहाय्य व ‘अमृत’ योजनेतूनही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्य शासनाकडून पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असून विविध कामे सुरू आहेत. भविष्यातही आवश्यक निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment