१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात महिला व बालविकास विभाग प्रथम
महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.
हा सेवाकर्मी उपक्रम राज्यातील शासकीय सेवांची प्रगती सर्वांगीणपणे मोजण्यासाठी तसेच पारदर्शक, कार्यक्षम आणि जबाबदार प्रशासनाला चालना देण्यासाठी राबविण्यात आला होता. या अंतर्गत विभागाच्या संघटनात्मक रचना, सेवाप्रवेश नियम, पदोन्नती व थेट भरती स्थिती, गोपनीय अहवालांचे व्यवस्थापन, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण तसेच विभागीय चौकशी प्रकरणांच्या निपटाऱ्यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.
No comments:
Post a Comment