Thursday, 19 March 2026

धुळे शहरात नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा

 मंत्री बावनकुळे म्हणाले कीधुळे शहरात नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे या अतिक्रमणांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या संदर्भात एप्रिल महिन्यात विशेष बैठक घेण्यात येईल. तसेच या प्रकरणाची जबाबदारी मंत्रालयातून उपजिल्हाधिकारी (निवासी) यांच्याकडे सोपविण्यात येणार असून उच्च न्यायालयातील प्रकरणासाठी विशेष वकील नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या न्यायालयाने दिलेला स्टेटस को’ आदेश मागे घेण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे. ज्या ठिकाणी न्यायालयाचा स्टेटस को’ लागू नाहीत्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi