Friday, 27 March 2026

राज्यात बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत येणाऱ्या वारंवार तक्रारींची दखल घेऊन

 राज्यमंत्री आशिष  जयस्वाल म्हणाले कीराज्यात बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत येणाऱ्या वारंवार तक्रारींची दखल घेऊन शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक असून यासंदर्भात धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल.

सध्या बियाणे निकृष्ट असल्याचे सिद्ध झाल्यास शेतकऱ्यांना ग्राहक न्यायालयात दाद मागावी लागते. मात्रया प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार दोन महत्वाच्या धोरणांवर काम सुरू आहे. त्यामध्ये बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थेट मदत किंवा नुकसानभरपाई देण्याचा समावेश करण्यात येणार आहे. शेतमाल विक्रीनंतर व्यवहारांचा  नोंदवही अभावामुळे शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास न्यायालयीन प्रक्रिया करावी लागतेही बाब लक्षात घेऊन त्या संदर्भातही स्वतंत्र एसओपी तयार करण्यात येणार आहेअशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi