Thursday, 26 March 2026

पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

 विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

 

             मुंबईदि. २५ : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन २२ जून २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा.राम शिंदे यांनी तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

 

विधानपरिषदेत प्रत्यक्षात १४३ तास  ५१ मिनिटे कामकाज

 

विधान परिषदेत १४३ तास ५१ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ११ मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८३.५४ टक्के होतीतर एकूण सरासरी उपस्थिती ही ७३.७५ टक्के इतकी होती.

विधानपरिषदेत ५ विधेयके पूर:स्थापित करण्यात आली तर ४ संमत करण्यात आली. विधानसभेने पारित केलेली १९ विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली. तर ४ विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली.  सभागृहात नियम ९७ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५४तर ५३ सूचना मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल सभापती राम शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi