इंद्रायणी आणि पवना नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी ६७४ कोटी रुपयांच्या ३९ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी सुरू केली जात आहे. संबंधित एमआयडीसी क्षेत्रांनाही आवश्यक निर्देश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमणविरोधी कारवायाही सुरू असून त्याबाबतची सविस्तर माहिती नंतर दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे विभागाच्या विकासकामांचा नियमित आढावा घेण्यासाठी दर १५ दिवसांनी बैठक आयोजित केली जाणार असून स्थानिक लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेतले जाईल. या बैठकींचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment