Wednesday, 25 March 2026

पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारखी शहरे नवोन्मेष आणि उद्योगशीलतेची महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास

 महाराष्ट्रात मुंबई या आर्थिक राजधानीशिवाय  पुणेनागपूरनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारखी शहरे नवोन्मेष आणि उद्योगशीलतेची महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास येत आहेत.

राज्यपाल हे २९ विद्यापीठांचे कुलपती आहे असे नमूद करून विविध विद्यापीठांमधून स्कूल कनेक्ट’ उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीणनिमशहरी तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे प्रोत्साहित करून भविष्यातील ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ घडविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत राज्यपालांनी त्यांना देशातील लाखो युवकांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यास प्रेरित करत राहण्याचे आवाहन केले. इंडिया टुडे ग्रुप आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी या पुरस्कारांची स्थापना करून देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या नव्या नेतृत्वाचा गौरव केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला इंडिया टुडेचे समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पामहिंद्रा ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनकांत गोलगुंटाइंडिया टुडे ग्रुप व महिंद्रा अँड महिंद्रा यांचे वरिष्ठ अधिकारीपरीक्षक मंडळाचे सदस्यपुरस्कार विजेते व त्यांचे कुटुंबीय तसेच मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi