राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित
नव्या नवेली नंदा, मोना सिंग, जेनेलिया देशमुख सन्मानित
मुंबई, दि. २५ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २४ मार्च) मुंबई येथे १५ उत्कृष्ट युवा उद्योजक व नवोन्मेषकांना इंडिया टुडे ग्रुप–महिंद्रा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपालांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रभावी उद्योगांमध्ये रूपांतरित केल्याबद्दल तसेच भारतातील स्टार्टअप संस्कृतीला चालना दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
कोणतेही मोठे कार्य युवा वयात होते असे सांगताना राज्यपालांनी संत ज्ञानेश्वर, आदि शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तींची उदाहरणे दिली व या सर्वांनी तरुण वयातच विलक्षण कार्य केले असल्याचे सांगितले. भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था असून दोन लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि १०० हून अधिक ‘युनिकॉर्न’ कंपन्या आहेत, असे राज्यपालांनी नमूद केले. एकट्या २०२५ या वर्षातच ४४,००० हून अधिक नवीन स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून त्यातून २१ लाखांपेक्षा अधिक थेट रोजगारनिर्मिती झाली आहे. यापैकी जवळपास निम्मे स्टार्टअप्स छोट्या मोठ्या शहरांतून उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment