Monday, 2 March 2026

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

 भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा

अश्वारूढ पुतळा उभारणार

·         शिवस्वराज्य यात्रेचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत

 

नवी दिल्ली, 2 : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या पुंछ येथे दिमाखात उभा राहणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पुणे येथून निघालेली भव्य  'शिवस्वराज्य यात्राराजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाली. यावेळी  'जय भवानीजय शिवाजी'च्या जयघोषात या रथाचे आणि शिवरायांच्या पुतळ्याचे अत्यंत उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.

            या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, ,महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुलसहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळेआम्ही पुणेकरसंस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले. यावेळी दिल्लीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi