सोलर इंडस्ट्रीचे योगदान अभिमानास्पद - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर देश आपली संरक्षणसिद्धता वाढवित आहे आणि विश्वशांतीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रोबोटीक इंजिन आणि ड्रोनच्या क्षेत्रात मोठी प्रगती होत असून सध्या जगभरात सुरु असलेल्या संघर्षातून त्याची प्रचीती येत आहे. सोलरचा हा प्रकल्प देखील भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळलेला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राची क्षमता लक्षात घेता सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे, याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लक्ष वेधले.
या कार्यक्रमात रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी निर्मिती विषयीची माहिती देणारी ध्वनीचित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी यावेळी बोलताना समूहाच्या आजवरच्या वाटचालीची तसेच भविष्यातील ध्येय, धोरणांविषयीची भूमिका मांडली. राघव नुवाल यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment