पुणे विभागातील पायाभूत सुविधा व वाहतूक प्रकल्पांना गती
-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २५ – पुणे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नीती आयोगाच्या सहकार्याने सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा ‘ग्रोथ प्लॅन’ तयार करण्यात आला असून, मेट्रो, रस्ते आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून या भागाचा वेगाने केला साधला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य महेश लांडगे यांनी याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे विभागाच्या विकासासाठी कार्यकारी, समन्वय आणि शिखर समित्यांची स्थापना १५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली. या ग्रोथ प्लॅनमध्ये मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, औद्योगिक कॉरिडॉर तसेच कॉर्पोरेट सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याचा निर्णय चुकीचे नियोजन टाळण्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, त्यानंतर संपूर्ण भागासाठी नव्याने धोरणात्मक नियोजन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसमावेशक वाहतूक आराखडा, ग्रोथ सेंटर कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्यावर भर देण्यात ये
त आहे.
No comments:
Post a Comment