अमेरिका–इराण संबंधांवरील चर्चेत राजदूत टी.सी.ए. राघवन, मिन्हाज मर्चंट आणि प्रबळ दासगुप्ता यांनी सखोल विश्लेषण केले.
“भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास” या सत्रात या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी यांनी सहभाग घेत भारतीय सभ्यतेचे सातत्य आधारांवर प्रकाश टाकला.
फेस्टिव्हलचा समारोप सागरातील जीवनावरील सत्राने झाला. तसेच, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे कलाकार वंदना कृष्णा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या सत्रांमुळे मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल हे संवाद, विचार आणि ज्ञानविनिमयासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.यामध्ये विद्यार्थी लेखक साहित्यीक मान्यवरांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.
0000
No comments:
Post a Comment