Sunday, 29 March 2026

मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल : एनजीएमए मुंबईत पहिल्या दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल : एनजीएमए मुंबईत पहिल्या दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि.२८: मुंबईतील नॅशलन गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट येथे आयोजित मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. विविध वयोगटांतील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पारंपरिक दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यानंतर दिवसभर विविध विषयांवर दर्जेदार व विचारप्रवर्तक सत्रांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सत्र “मुंबई: बिटवीन AQI अँड ड्रीम्स” मध्ये भारत घोटोसकरलुईस मिरांडानिधी चौधरी आणि आर. वेंकटेश यांनी मुंबईतील नागरी जीवनातील आव्हाने, स्वप्ने आणि वास्तव यांचा सखोल वेध घेतला.

यानंतर “हिडन अँड कोल्ड वॉर्स” या सत्रात मंगेश सावंतसचिन देवधरसंजीव चोपरा आणि विभू वैभव यांनी जागतिक राजकारणातील पडद्यामागील संघर्षांवर प्रकाश टाकत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi