Sunday, 29 March 2026

दिवसभरातील विशेष आकर्षण ठरलेल्या “५ अ‍ॅसॅसिनेशन्स अँड अन आर्म्स डील: द सुंदरजी स्टोरी”

 दिवसभरातील विशेष आकर्षण ठरलेल्या “५ अ‍ॅसॅसिनेशन्स अँड अन आर्म्स डील: द सुंदरजी स्टोरी” या सत्रात प्रोबल दास गुप्ता आणि संदीप उन्नीथन यांनी १९८० च्या दशकातील घडामोडींवर तसेच जनरल ब्रास्टॅक्स या पुस्तकावर आधारित रोचक संवाद साधला. त्यानंतर “बिटवीन ब्रेकपॉईंट अँड बिगिनिंग्स” या सत्रात सौरभ मुखर्जीशिंन्जीनी कुमार आणि रजनी पानीकेर यांनी कामकाज, संपत्ती आणि महिलांच्या बदलत्या भूमिकांवर सखोल चर्चा केली.

दुपारच्या सत्रात मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी तर्फे १९४६ च्या नौदल उठावावर आधारित लघुपट सादर करण्यात आला. त्यानंतर “१९४६ चे स्वातंत्र्याचे शेवटचे युद्ध” या विषयावरील चर्चेत प्रमोद कपूरकोमोडोर श्रीकांत केसनुर आणि संदीप उन्नीथन सहभागी झाले. या चर्चेत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या पण कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायावर प्रकाश टाकण्यात आला.

इतिहासप्रेमींसाठी “द माईटी चोलाज” या सत्रात अमिश त्रिपाठीएस. क्रिशननडॉ. कजारी कमल यांनी चोल साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची मांडणी केली.

पहिल्या दिवसाचा समारोप वाईस ॲडमिरल क्रीश्ना स्वामीनाथन, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांच्या प्रेरणादायी फायरसाईड चॅटने झाला. एकूणच, विचारप्रवर्तक चर्चा, विविध विषयांची समृद्ध मांडणी आणि मोठ्या प्रमाणातील प्रतिसादामुळे मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलचा पहिला दिवस यशस्वी ठरला असून पुढील सत्रांसाठी उत्सुकता अधिकच वाढली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi