आर्थिक प्रगतीबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाची
- मंत्री चंद्रकांत पाटील
65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि.10:- कोणताही समाज कला, क्रीडा आणि साहित्याच्या विकासामुळेच मोठा होत असतो. आर्थिक प्रगतीबरोबरच या क्षेत्रांतील प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. शासनाने प्रदर्शन आणि विविध पुरस्कारांच्या माध्यमातून कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असून पुरस्कारांच्या रकमांमध्येही भरीव वाढ करण्यात आली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू हीमकुमार चटर्जी, कला संचालनालयाचे संचालक डॉ किशोर इंगळे, पद्मश्री वासुदेव कामत, ज्येष्ठ शिल्पकार किशोर ठाकूर, आदी उपस्थित होते.
राज्य कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले असून यावेळी कला जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment