Wednesday, 25 February 2026

नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास वैद्यकीय क्षेत्रावरील ताण कमी

 नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास वैद्यकीय क्षेत्रावरील ताण कमी

– राज्यपाल आचार्य देवव्रत

            नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असूननैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास वैद्यकीय क्षेत्रावरील ताण कमी होऊ शकतो. मानवनिसर्ग आणि धरती वाचवण्यासाठी  आजारांचे वाढते प्रमाण रोखण्याच्या दृष्टीने वैद्यकीय तज्ञांनी  कार्य करण्याची गरज असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.

 

कोविड-१९ काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने लसीचा शोध लावून सर्वे भवन्तु सुखिनः’ या तत्वानुसार जगातील अनेक देशांना लस उपलब्ध करून दिली. गरीब व वंचित घटकांसाठी कार्य करणे हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा पैलू असूनत्याच भावनेतून आरोग्य क्षेत्रात सेवा कार्य अधिक व्यापक व्हावेअसे  आवाहन राज्यपाल देवव्रत यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi