हिंदुजा रुग्णालय समूहाच्या वतीने गेल्या 75 वर्षांत मानवतावादी दृष्टिकोनातून उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देश-विदेशातील रुग्णांना दर्जेदार उपचार देऊन या संस्थेने भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे, असे त्यांनी सांगितले.ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित आणि गरजू रुग्णांना सेवा देण्याचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कॅन्सर, हृदयविकार, किडनीशी संबंधित आजारांच्या मुळावर उपचार होणे अत्यावश्यक असून, दिनचर्या, आहार पद्धती यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी सखोल विचार करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत सांगितले.
No comments:
Post a Comment