‘प्रधानमंत्री गति शक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पांचा मुख्य उद्देश एकात्मिक नियोजन आणि विविध घटकांच्या सल्लामसलतीद्वारे बहुमार्गीय संपर्क मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीर आणि वाहतूक कार्यक्षमता वाढवणे हा आहे. यामुळे लोक, वस्तू आणि सेवांची अखंडित वाहतूक सुनिश्चित होईल. या क्षमता वाढीमुळे देशातील अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपर्यंत रेल्वे संपर्क सुधारेल, ज्यात जबलपूरचे कचनार शिव मंदिर, बालाघाटमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, धुआंधार धबधबा आणि दलमा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे.
हे प्रकल्प कोळसा, पोलाद, लोखंड खनिज, सिमेंट, अन्नधान्य आणि खते यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचे मार्ग उपलब्ध करून देतील. या रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे दरवर्षी 52 दशलक्ष टन (MTPA) अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल. रेल्वे हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कार्यक्षम पर्याय असल्याने, हे प्रकल्प देशाच्या हवामान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहायक ठरतील. यामुळे तेल आयातीत सुमारे 6कोटी लिटरची बचत होईल आणि 30 कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन घटणार आहे, जे सुमारे 1 कोटी वृक्ष लागवडीइतके परिणामकारक ठरेल.
No comments:
Post a Comment