Thursday, 26 February 2026

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्रासह 8 जिल्ह्यांतील रेल्वे मार्गवाढीच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी · गोंदिया -जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला मंजुरी

  

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्रासह 8 जिल्ह्यांतील रेल्वे मार्गवाढीच्या

तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी

·         गोंदिया -जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला मंजुरी

 

नवी दिल्ली, 24 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 9,072 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गवाढीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील गोंदिया – जबलपूर मार्ग दुहेरीकरणाचा समावेश आहे.

महाराष्ट्रमध्य प्रदेशबिहार आणि झारखंड या चार राज्यांतील8 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे 307 कि.मी.ची भर पडणार आहे. यामध्ये गोंदिया-जबलपूर दुहेरीकरणासोबतच पुनारख-किऊल आणि गम्हरिया-चांडिल या मार्गांच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या कामांचा समावेश आहे.

या प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे 5,407 गावे आणि जवळपास 98 लाख लोकसंख्येचा रेल्वे संपर्क अधिक सुधारेल. रेल्वे मार्गांची वाढलेली क्षमता वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणेलज्यामुळे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सेवा विश्वसनीयता वाढेल. या निर्णयामुळे रेल्वे संचालन अधिक सुलभ होईल आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीतील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारत’ दृष्टिकोनानुसार हे प्रकल्प प्रादेशिक सर्वांगीण विकास साधण्यावर भर देतातज्यातून स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढून नागरिक आत्मनिर्भर बनतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi