विद्यार्थी आणि पालकांच्या योगदानातून बालभवनचे कार्य अधिकाधिक उत्तम होत आहे. बालभवनची नवीन वास्तू आता आकार घेत आहे. ही नवी वास्तू नवतंत्रज्ञानाने सुसज्ज अशी राहणार असून त्यामध्ये वातानुकुलीत ई-लॅब, भव्य प्रेक्षागृह आदी सर्वच सुविधा राहणार असल्याचे बालभवनच्या संचालिका निता पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
वर्धापन दिनानिमित्त निबंध लेखन, काव्यलेखन, चित्रकला, रंगभरण, गायन व नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment