Thursday, 26 February 2026

मुंबईत 27,28 फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

 मुंबईत 27,28 फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

- सभापती रवींद्र साठे

ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी कराव्यात

 

मुंबईदि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 27 आणि 28 फेब्रुवारीला छोट्या  उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यातअसे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.

रविंद्र साठे यांनी सांगितले कीकेंद्र सरकारचे  सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्रालययांचे कार्यालयघाटकोपर-अंधेरी लिंक रोडसाकीनाकाअंधेरी (पूर्व) येथे होणार आहे. हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी या वेळेत सर्वांसाठी खुले  राहणार आहे. 

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 8 प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कारागीर व शिल्पकारांच्या उत्पादनांच्या विपणन व ब्रँडिंगसंदर्भात जनजागृती करण्यासाठी 34 एकदिवसीय कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात 100 स्टॉलद्वारे ग्रामीण भागातील छोट्या कारागिरानी तयार केलेल्या बांबू हस्तकलाफर्निचर साहित्यतयार कपडेमातीची भांडी (कुंभारकाम)दागिने तसेच इतर पारंपरिक हस्तकला उत्पादने ठेवण्यात येणार आहेत. खादी म्हणजे केवळ कापड नव्हेयामध्ये छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तू आहेत. मुंबईतील नागरिकउद्योजकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावेअसे आवाहन रविंद्र साठे यांनी केले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते होणार असून मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर उपस्थित राहणार असल्याची माहिती एमएसएमईचे संचालक मिलिंद बारापात्रे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi