Friday, 6 February 2026

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षण · निवडणूक आयोगाकडून १,४४४

 आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षण

·         निवडणूक आयोगाकडून १,४४४ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

 

मुंबईदि. 5 : आसामकेरळपुद्दुचेरीतामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या केंद्रीय निरीक्षकांसाठी भारत निवडणूक आयोगाने (ECI) विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन बैठका आयोजित केल्या.

या प्रशिक्षणासाठी एकूण १,४४४ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असूनत्यामध्ये ७१४ सर्वसाधारण निरीक्षक२३३ पोलीस निरीक्षक आणि ४९७ खर्च निरीक्षकांचा समावेश आहे. या बैठका ५ व ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसांत तीन टप्प्यांत नवी दिल्ली येथील IIIDEM संस्थेत होत आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi