मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी केंद्रीय निरीक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी निरीक्षकांना निवडणूक आयोगाचे “दीपस्तंभ” असल्याचे सांगत, ८२४ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे स्पष्ट केले.
निवडणूक आयुक्त डॉ. एस.एस. संधू यांनी निरीक्षकांनी क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसाठी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले. निरीक्षकांचे आगमन प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावे आणि मतदारांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करून कोणत्याही पक्षपातीपणाची भावना निर्माण होऊ देऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment