Friday, 13 February 2026

चारचाकी खासगी वाहनांसाठी एमएच 01 एफडी आगाऊ मालिका सुरू

 मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये

 चारचाकी खासगी वाहनांसाठी एमएच 01 एफडी आगाऊ मालिका सुरू

 

मुंबईदि. 12 : प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) येथे चारचाकी खाजगी परिवहनेतर (४W LMV NT) वाहनांसाठी एमएच 01 एफडी ही नवीन आगाऊ नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली एमएच 01 एफबी मालिका लवकरच संपुष्टात येत असूनत्याऐवजी ही नवीन मालिका नियमित करण्याचा प्रस्ताव आहे.

 

महाराष्ट्र मोटार वाहन नियम१९८९ मधील सुधारित नियम ५४ (अ) नुसार वाहनधारकांना पसंतीचा किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक आगाऊ शुल्क भरून आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कार्यालयीन विहित नमुन्यातील अर्जाद्वारे कोणताही उपलब्ध वाहन क्रमांक आरक्षित करता येतो. यासाठी विहित शुल्काचा धनाकर्ष प्रादेशिक परिवहन अधिकारीमुंबई (मध्य) किंवा Regional Transport Office, Mumbai (Central) यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi