गृह राज्यमंत्री कदम म्हणाले की, २०१२ मध्ये स्थापन झालेल्या कांदळवन विभागांतर्गत मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असून, सध्या या विभागात १८४ जवान कार्यरत आहेत. मात्र, आतापर्यंत अतिक्रमणाच्या मुद्द्यावर गृह विभाग व संबंधित विभागाची संयुक्त कारवाई झालेली नव्हती.
अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणातून उभ्या राहिलेल्या वस्त्यांची विक्री बेकायदेशीररीत्या भारतात आलेल्या व्यक्तींना करण्यात आल्याचे गंभीर प्रकार लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी संपूर्ण कांदळवन विभागाचे गुगल मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील सहा ते आठ महिन्यांत २०१२ पूर्वीपासून सुरू असलेल्या अतिक्रमणांची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे
No comments:
Post a Comment