Friday, 17 October 2025

जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली

 जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली

 

मुंबईदि. १७ : ज्येष्ठ नेतेराहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसहअहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहेअशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेलेतळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारेसहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघ आणि अहिल्यानगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदारसंघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डिले यांच्या निधनाने कर्डिले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi