Friday, 17 October 2025

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

 कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

मुंबईत जलवाहतुकीत लवकरच नवीन तंत्रज्ञान क्रांती

 

मुंबईदि. १७ : कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधुनिकस्मार्ट आणि जागतिक मुंबई या दृष्टीकोनाच्या अनुषंगानेमंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली.

मंत्री नितेश राणे म्हणाले कीहा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागतिक मुंबईच्या स्वप्नपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईत कॅन्डेलाची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल.या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूककिनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून नवीन रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi