Sunday, 5 October 2025

दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत

 दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत

 

        मुंबईदि. 6माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

            जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. तर 'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवारदि. 10,  शनिवार दि. 11 आणि सोमवार दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभाग विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवत आहे. या योजनांचा उद्देश महिलांचे सक्षमीकरणबालकांचे आरोग्य व पोषणतसेच त्यांच्या शिक्षण आणि सुरक्षेला बळकटी देणे हा आहे. यामध्ये लाडकी बहिण योजनापोषण आहार योजनाबालसंवर्धन योजनावन स्टॉप सेंटरबालसंरक्षण उपक्रममहिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवायआंगणवाडी सेवांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील बालकांना शिक्षणपोषण व आरोग्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. या योजना आणि उपक्रमांमुळे राज्यातील हजारो महिला व बालकांना नव संजीवनी लाभत असून समाजातील दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येत असून याची अंमलबजावणी व नियोजन कशा प्रकारे करण्यात येत आहेयाविषयी सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi