Thursday, 30 October 2025

स्वराज्य : एकतेचा धागा

 स्वराज्य : एकतेचा धागा

गुजरात येथे राष्ट्रीय संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी स्वराज्य : एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात येणार आहे. या चित्ररथासोबत १४ कलाकारांचा चमू  सांस्कृतिक सादरीकरण करणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम ७ आणि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्साठी गोंधळनृत्यकोळी नृत्यलावणी तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले १५ ते २० कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे.  या उपक्रमांद्वारे राज्याचे ऐतिहासिकसांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव  राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi