Thursday, 30 October 2025

गुजरातमध्ये भव्य भारत पर्व सोहळा

 गुजरातमध्ये भव्य भारत पर्व सोहळा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य भव्य सोहळा गुजरातमधील एकता नगर (जिल्हा नर्मदा) येथे करण्यात येणार आहे. यावेळी भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. संचलनादरम्यान सीएपीएफ आणि विविध राज्यांच्या पोलिस तुकड्या त्यांच्या शौर्य, शिस्त आणि कौशल्याचे प्रदर्शन करतील. या   संचलनात बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, तसेच महाराष्ट्र, पंजाब, केरळ, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, आसा, त्रिपुरा आणि छत्तीसगड राज्यांच्या पोलीस तुकड्या सहभागी होतील. घोडदळ, उंटदळ, भारतीय श्वानांच्या प्रजाती, तसेच विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींचे सादरीकरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्याद्वारे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार आहेत

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi