Sunday, 7 September 2025

महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल - पर्यटनमंत्री शंभुराज देसाई

 महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल - पर्यटनमंत्री शंभुराज देसाई

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्याचा अविभाज्य भाग आहे. परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी करून घेणेहा आपल्या परंपरांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाची ख्याती जगभरात पोहोचेल, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. तर, आम्ही पर्यटकांसाठी एक असे व्यासपीठ निर्माण केलेजिथे ते या उत्सवाचा थेट अनुभव घेऊ शकले. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी म्हटले आहे.

पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, आमच्या विशेष दालनामुळे पर्यटकांना केवळ मिरवणूक पाहण्याचीच संधी मिळाली नाहीतर ते गणेशोत्सवाच्या खऱ्या भावनेशी जोडले गेले. त्यांनी दाखवलेला उत्साह आणि प्रेम पाहून आम्ही प्रेरित झालो आहोत. ढोल-ताशांच्या गजरातभक्तिमय वातावरणात आणि गणरायाच्या निरोपाच्या हृदयस्पर्शी क्षणात सहभागी होऊन या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या आतिथ्यशील संस्कृतीचा अनुभव घेतला. हा अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभर कोरला जाईल.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi