Tuesday, 9 September 2025

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार

 राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार

मेघना बोर्डीकर

मुंबई,दि.८ : परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले असून जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रमाण पाहून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री  बोर्डीकर यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालूनपरभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले आहे. नगरपंचायतनगरपालिका व महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राज्यमंत्री  बोर्डीकर म्हणाल्या  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्यविकासबचत गटांचे सशक्तीकरणगृहउद्योग प्रोत्साहनआरोग्य व निवारा सुविधा यांसारखे कार्यक्रम राबवले जातील. यासाठी शासनस्थानिक स्वराज्य संस्था आणि सी आर एस भागीदार यांच्यामार्फत एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

तालुका व जिल्हा स्तरावर कृतीगट स्थापन करण्यात येणार ६० वर्षांवरील महिलांसाठी वृद्धापकाळातील योजनांचा अभाव लक्षात घेता त्यांना आरोग्यसुरक्षितता व उदरनिर्वाहासाठी नवे उपक्रम राबवले जाणार आहेत. उमेद व माविम यांच्या मदतीने स्वयंरोजगार व कौशल्यविकासाचे प्रयत्न वेगाने सुरू करण्यात येणार असून तालुका व जिल्हा स्तरावर कृतीगट स्थापन केले जातील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi