Sunday, 7 September 2025

अनंत चतुर्दशी : गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पर्यटकांनी अनुभवली महाराष्ट्राच्या संस्कृतीची जादू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती

 अनंत चतुर्दशी : गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पर्यटकांनी अनुभवली महाराष्ट्राच्या संस्कृतीची जादू

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

 

            मुंबईदि.7  : मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगांव चौपाटी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने संयुक्तपणे उभारलेल्या विशेष दालनाला भेट देत विसर्जन होत असलेल्या बाप्पाची आरती केली. यावेळी परदेशी पर्यटकांनी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचा थक्क करणारा अनुभव घेतला. तर, थायलंड येथून हा विसर्जन सोहळा अनुभवण्यास आलेल्या पर्यटकांनी आरतीतही सहभाग घेतला. याप्रसंगीमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यटन विभागाने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले.

            अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर आयोजित गणेश विसर्जनाच्या भव्य सोहळ्याने परदेशी पर्यटकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा अनमोल ठेवा त्यांनी आपल्या हृदयात आणि कॅमेऱ्यात कायमस्वरूपी जतन केला.

गणेश विसर्जनाचा हा भव्य सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी’ मॉरिशसकोरियाअमेरिकाथायलंडजपान आणि दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांना केवळ मिरवणुकीच्या भव्यतेचे दर्शनच घेता आले नाहीतर त्यांना गणरायाची श्रद्धेने पूजा करणेआरतीत सहभागी होणे आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सामील होण्याची संधी मिळाली. पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेत सज्ज होऊनढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हे पर्यटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीत तल्लीन झाले.

या सोहळ्याला पर्यटन संचालनालयाचे संचालक  डॉ बी. एन. पाटीलपर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi