Saturday, 14 June 2025

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना

  

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी

व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना

 

मुंबई, दि.१३ : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती मंडळ आणि नोंदणी विभागातील अधिकारी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या दु:खद प्रसंगी पीडित कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभे असूनत्यांच्या दु:खात सामील असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पीडित कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगी बळ आणि मानसिक आधार मिळावायासाठी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

त्याचप्रमाणेबी. जे. मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलअहमदाबाद येथील प्राध्यापकविद्यार्थी आणि कर्मचारी वर्गासाठीही आपल्या सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi