Saturday, 14 June 2025

दिलखुलास' कार्यक्रमात संचालक सतिशकुमार खडके यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात संचालक सतिशकुमार खडके यांची मुलाखत

 

मुंबई दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'आपत्ती पूर्व व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व अंमलबजावणीया विषयासंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतिशकुमार खडके यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 16मंगळवार दि.17बुधवार दि.18गुरुवार दि. 19 आणि शुक्रवार दि.20 जून 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वाढते तापमानवेळी-अवेळी पडणारा पाऊस आणि इतर अनपेक्षित नैसर्गिक घटना यामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी राहात आहेत. नैसर्गिक आपत्तींपासून ते मानवनिर्मित आपत्तींपर्यंत आणि आगीसारख्या दुर्घटनांपर्यंत अनेक घटनांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. या संकटांचा शास्त्रशुद्धप्रभावी आणि सुसंघटित पद्धतीने सामना करण्यासाठी शासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही त्रिस्तरीय यंत्रणा अखंडपणे कार्यरत असूनआपत्तीपूर्व नियोजनतत्काळ प्रतिसाद आणि पुनर्वसन या सर्व टप्प्यांवर ही यंत्रणा सजगतेने काम करत आहे.

आपत्ती टाळता यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण व्हावेयासाठी विविध स्तरांवर नियोजनबद्ध कार्यवाही केली जाते. गावपातळीवर स्थानिक प्रशासनस्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्याशी समन्वय साधूनसामूहिक जबाबदारीने आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केले जाते. या विषयावर 'दिलखुलासकार्यक्रमातून  संचालक श्री. खडके यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi