Thursday, 19 June 2025

खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

 खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

मुंबईदि. ,१९:- खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या  विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे  पुणे महानगरपालिका परिसरातील  नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi