Tuesday, 11 March 2025

कामगार आणि कष्टकरी वर्गाला न्याय देणारा अर्थसंक

 कामगार आणि कष्टकरी वर्गाला न्याय देणारा अर्थसंकल्प

- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

मुंबईदि. १० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प शेतीउद्योगव्यापारशिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करणारा आहे. त्यामुळे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विशेषतः कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी हा अर्थसंकल्प न्याय देणारा असूनत्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा ठरेलअसे मत कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र आता एका नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे आणि हा अर्थसंकल्प त्या दिशेने बळकट पाऊल असल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi