Tuesday, 11 March 2025

समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा ध्यास असणारा विकासाचा अर्थसंकल्प

 समृद्ध महाराष्ट्राची वाटचालप्रगतीचा ध्यास असणारा विकासाचा अर्थसंकल्प

- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई, दि. १० : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची  प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी हित आणि शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून समृद्ध महाराष्ट्राची वाटचालप्रगतीचा, विकासाचा  ध्यास आणि विकसित महाराष्ट्र घडविणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सन  2025-26 या आर्थिक वर्षासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी 3 हजार 98 कोटी  रुपयांची तरतुदी करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यात येणार आहे. महिलाबालकेयुवकगरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्नसुरक्षानिवारापिण्याचे शुद्ध पाणीआरोग्यसेवाशिक्षण सुविधा आणि रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करूनत्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडविण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi