Tuesday, 11 March 2025

राज्याच्या विकासचक्राला गती देणारा अर्थसंकल्प

 राज्याच्या विकासचक्राला गती देणारा अर्थसंकल्प

- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

            मुंबईदि. १० : विकसित भारत-विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारीत शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची हमी देणारा तसेच देश व राज्याच्या विकासचक्राला अधिक गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. यात उद्योगपायाभूत सुविधाकृषी व संलग्न क्षेत्रेसामाजिक क्षेत्र आदींचे जाळे अधिक विस्तृत करून सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

     जलजंगलजमीन आणि प्राचीन संस्कृतीचे रक्षण करणा-या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव वाढ करण्यात आली आहे. गत वर्षीच्या तुलनेत आदिवासी विकास विभागाच्या निधीमध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करून यावर्षी 21495 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीला चालना मिळणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.उईके यांनी सांगितले.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi