Friday, 28 March 2025

राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रित अर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 महिला व बालविकास मंत्रालयाकडून

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रित

अर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवातअंतिम मुदत 31 जुलै 2025

 

नवी दिल्ली, 28 :  केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार 1 एप्रिल 2025 पासून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.inऑनलाईन अर्ज करू शकतात. हा पुरस्कार दरवर्षी देशभरातील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना (वय वर्षे 5 ते 18) सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो.

 

शौर्यक्रीडासमाजसेवाविज्ञान व तंत्रज्ञानपर्यावरण आणि कला व संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

 

या पुरस्कारासाठी कोणतेही भारतीय नागरिकत्व असलेले व भारतात वास्तव्यास असलेले 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुले पात्र आहेत. अर्जदार स्वतः अर्ज करू शकतात तसेच इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेद्वारे त्यांचे नाव नामांकनासाठी सुचवले जाऊ शकते. केंद्रीय मंत्रालयानी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 ठेवली आहे. अधिक माहितीसाठी (https://awards.gov.inया वेबसाइटला भेट द्यावी.

 

दरवर्षी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे या पुरस्कारांचे आयोजन केले जातेज्यामध्ये विविध क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना गौरविण्यात येते.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi