Wednesday, 22 September 2021

 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

 

          मुंबई 22 : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तथा कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.  राज्यातील खेडोपाडीसर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.  स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र देत बहुजनकष्टकरी समाजाच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. समृद्धसुसंस्कृत महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कर्मवीर अण्णांचे योगदान मोलाचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षितसंस्कारी नवी पिढी घडविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

          उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतातकर्मवीर अण्णांनी जातीधर्मपंथवर्गाच्या भिंती तोडून शिक्षणाची दारे सर्वांना खुली करुन दिली. अज्ञानअंधश्रद्धागरीबीसारख्या समस्यांवर 'शिक्षणहाच एकमेव आणि प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी राज्यात शाळामहाविद्यालयेवसतीगृहे सुरु केली. गरीबांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणले. त्यांचे शिक्षण अखंड सुरु रहावे यासाठी 'कमवा आणि शिकासारखी योजना सुरु केली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी सुशिक्षितसुसंस्कृतनीतीवानप्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचे खुप मोठे काम केले आहे. कर्मवीर अण्णांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi