Wednesday, 22 September 2021

 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 'सुधारित घटना मसुदा-2021एकमताने मंजूर

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठीयुवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 21 : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठीकबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहनउपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 'सुधारित घटना मसुदा-2021एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकरआमदार भाई जगतापउपाध्यक्ष दिनकर पाटीलउपाध्यक्ष शकुंतला खटावकरसरकार्यवाह ॲड आस्वाद पाटीलसहकार्यवाह रविंद्र देसाईकोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

            गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकटकाळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहेत्यामुळे सर्वांनी अधिक सतर्कतेने कार्यरत रहावेअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

            विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 'सुधारित घटना मसुदा-2021बाबत चर्चा करून हा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

*****


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi