‘प्रथम तुला
वंदिता’
सर्व बंधु/भगिनींना लक्षवेधी मासमिडीया प्राय.लि
तर्फे हार्दिक शुभेच्छा.
लक्ष लक्ष लोकां़मधील सांस्कृतिक,
कला, क्रीडा व त्यांचे अंगीभूत असलेल्या कलागुणांना वेधून रोजगाराची संधीही उपलब्ध
व्हावी व त्याचबरोबर ग्रामीण, अदिवासी, भारतीय लोकसंस्कृतीची ओळख व्हावी व एकता निर्माण
होऊन राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळी वर लौकिक वाढून भारताची लोकसंस्कृती विश्वभर
नावारुपास यावी व त्याचबरोबर परदेशातील लोकसंस्कृतीची आदान प्रदान व्हावे, तसेच अर्थविषयक,
सामाजिक, पर्यटन, कृषी व औदयोगिक, उच्च तंत्रशिक्षणाव्दारे रोजगार निर्मीती व अन्यायग्रस्तांना
न्याय मिळावा हया उद्देशाने कायदेविषयक मार्गदर्शन व सहकार्य हयादृष्टीने लक्षवेधी मास मिडीया प्राय लि.ची वाटचाल राहणार
आहे. हयासाठी आपणा सर्वाचे सहकार्यही तितकेच गरजेचे आहे.
केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी
विविध योजना राबवित असते तथापी अफाट लोकसंख्या, जनसंपर्क, शिक्षण, तंत्रज्ञान अभावी
योजना जनसामान्यापर्यंत पोहोचणेस असंख्य अडचणी निर्माण होतात. याकरिता लक्षवेधी मास
मिडीया प्राय.लि तर्फे प्रकाशित करण्यात येणा-या जनजागर मार्गदर्शिका, न्युजपोर्टल्,
अॅप, ब्लॉग, पॉलिटीकेल डॉक्युमेंटरी, जीवनपट अशा विविध मार्गाने राष्ट्रनिष्ठा, आरोग्य,
न्याय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी, उदयोग, पर्यावरण,रोजगार, स्वयंरोजगार,
आरोग्य, कायदा, न्याय, महिला, बाल, जेष्ठ नागरिक, दिव्यांग अशा विविध क्षेंत्रातील
राज्य/केंद्र शासनाची धोरणे, योजनांची माहिती
उपलब्ध केली जाणार आहे.
सर्वसामान्यांना त्यांचे हक्क व कर्तव्ये
यांचीही जाणीव होऊन देशाचे उत्तम व सुजाण नागरिक व्हावे. यासाठी संविधानाची माहितीही
देण्यात येणार आहे.
अनुदान, आर्थिक सहाय्य, कर्ज, अडचणी,
समस्या निरसन, तसेच आरोग्यविषयक, कायदेविषयक सल्ला हयासाठी लक्षवेधीतर्फे मार्गदर्शनाचीही
सेवा केंद्रमार्फत नाममात्र फी मध्ये उपलब्ध करण्यांत आली आहे.
लक्षवेंधीतर्फे हस्तकला, क्रीडा, सांस्कृतिक,
रोजगार, स्वसंरक्षणाचे वर्गही चालविण्यात येणार आहेत ज्यामुळे बेराजगारांना रोजगाराच्या
संधीही उपलब्ध होतील. यासाठी lakshvehimm.blogspot.com रोजगार मध्ये
नोंदणी करावी.
यास्तव आपण आयोजित केलेले पांरपारिक,
सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रम, समारंभ, प्रदर्शन, महोत्सव, उदयोग व रोजगार, क्रीडा, कृषीविषयक उपक्रम, ऑडियो, व्हिडीयो व्दारे
(lakshvehimm.blogspot.com वर प्रसारणासाठी मेलव्दारे) पाठवाव्या.
जेणेकरुन आपणांकडून इतरांना, मंडळांना प्रेरणा
व मार्गदर्शन मिळेल. ‘जिद हो
जैसी, जय हो वैसी’ ‘जय हो
०१’ या ब्लॉगद्वारे वाचक, लेखक,
युवा, महिला, जेष्ठ नागरिक व किलबिल ग्रुपला आपले अनुभव, कला, आवड, हस्त, पाक, कौशल्ये,
कृषी, उदयोग, तंत्रज्ञान प्रसारित करण्यासाठी
उत्तम ज्ञानार्जनसाठी उत्तम संधी उपलब्ध केली जात आहे. त्याचबरोबर आपल्यावर होत असलेल्या
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळण्यासाठीही लक्षवेधी उत्तम व्यासपीठ आहे. यासाठी आपले अमुल्य वेळेचे स्वागतआहे. ज्यामुळे सर्वाना प्रेरणा मिळू शकेल.
मा. खासदार, आमदार, नगरसेवक, ग्रामसेवक,
औदयोगिक कंपन्या, बँका, पतपेढी, प्रायोजक, अदिवासी, ग्रामीण, नागरी भागातील शेतकरी,
कामगार, कष्टकरी, महिला मंडळे, क्रीडा मंडळे, युवक मंडळे, बचतगट, सहकारी संस्था, शैक्षणिक
संस्था, जेष्ठ नागरिक, अदिवासी, ग्रामीण, नागरी परिसरातील जनतेला, ग्राहक यांनाही विनंती
करण्यात येते की, जनजागर माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेता यावा व
सर्वसामान्यांचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी योगदान असावे याकरिता स्मृतीप्रित्यर्थ,
वर्धापन दिन, वाढदिवस वा अन्य कार्यक्रमाप्रसंगी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या
वाचन प्रेरणा दिवसाचे महत्व जाणून पुस्तकरुपी स्मृतीत रहावे व गरजूंना सहकार्य,
पाठिंबा देण्यासाठी जाणता मार्गदर्शक
म्हणून हया माहिती पुस्तिकेच्या प्रती आपले शुभहस्ते वितरित करुन आपला अमुल्य वेळ समाजाप्रति
देऊन आपली कर्तव्य तत्परता दाखवावी व आपला समाजोपयोगी कार्यकर्ता म्हणून आदर्श रहावा,
यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवून दिशा दाखवावी.
तसेच आपल्या क्षेत्रातील सामाजिक कार्ये
करणारी युवा, क्रीडा, महिला मंडळे, बचतगट, कामगार संघटना यांच्या माध्यमातून अवयवदानाचे
महत्व प्रसारित करुन जास्तीत जास्त लोकांचे अवयवदानाचे फॉर्म भरणेबाबत आवाहन करावे
जेणेकरुन गरजुना अवयवदानान्वये जीवनदान मिळण्याचे
पवित्र कार्य पार पडावे.व सामाजिक ऋñण फेडावे.
आपल्या सर्वाच्या सहकार्य व योगदानातून
सामाजिक कार्य करणेसाठी लक्षवेधी मास मिडिया
प्राय लि.तर्फे ५ टक्के निधी मा. मुख्यमंत्री सहाय्य निधि, सैनिक कल्याण
बोर्ड, अंध अपंग, दिव्यांग, अनाथ, जेष्ठ नागरिक, महिला आश्रम यांना उपक्रमासाठी देण्यात
येणार आहे व अशीच कार्य करणेसाठी आपणांकडून मोैलिक सहकार्य व प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. त्याचप्रमाणे आपल्या
सूचना, विचार, मार्गदर्शन ही लक्षवेधी मास
मिडीया प्राय.लि यांना अपेक्षित आहे.
बंधु भगिनींना, हा माझा प्रवास कौटुंबिक,
मित्र, परिवारांना उपहासाचा, चेष्टेचा विषय असला तरी वयाच्या साठाव्या वर्षी सेवा निवृत्तीनंतर
प्रसारमाध्यमांच्या महासागरात पोहोण्याचा सराव नसलेल्यांना पोहण्यासाठी होणारी दमछाक,
सर्वसामान्यामध्ये असणारे असमान्यत्व माझ्यासारख्या असंख्य बंधुभगिनींना जय हो ०१ lakshvehimm.blogspot.com जिद
हो जैसी, जय हो वैसी प्रेरणादायी
ठरो. असेच ब्लॉग पाठवून इतरांनाही जय हो ०१
म्हणून प्रेरित करावे ही विनंती.
लक्षवेधीसाठी आपणां सर्वाचें, स्नेही,
सहकारी, मार्गदर्शक यांची प्रेरणा व सहकार्य मिळाल्यानेच जनजागर माहिती पुस्तिका ब्लॉग,
न्युज पोर्टल करण्यास अलौकिक शक्ती प्राप्त झाली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व अशीच
प्रेरणा, सहकार्य भविष्यातही मिळो व उत्तरोत्तर लक्षवेधी कार्ये घडो ही सदिच्छा.
धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र
वैशाली
भगत,
संचालक
No comments:
Post a Comment