Sunday, 19 July 2026

मिशन ऑरेंज सिटी’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 मिशन ऑरेंज सिटी उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

नागपूर, दि. १८ : मिशन ऑरेंज सिटी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी संत्र्याचे रोप लावत उपक्रमाचा  शुभारंभ केला. 

यावेळी महापौर नीता ठाकरे, आमदार परिणय फुके, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक अतुल पांडे तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 मिशन ऑरेंज सिटी हा उपक्रम दैनिक महाराष्ट्र टाईम्स या समूहातर्फे राबविण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

000


राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील जगन्नाथ रथयात्रेला आरंभ; झाडू घेऊन राज्यपालांनी केली रथयात्रा मार्गिकेची स्वच्छता

 राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील जगन्नाथ रथयात्रेला आरंभ;

झाडू घेऊन राज्यपालांनी केली रथयात्रा मार्गिकेची स्वच्छता

मुंबई, दि. १८ : इस्कॉन, जुहू तर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कुल, अंधेरी, मुंबई येथून आरंभ झाला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत राज्यपालांनी रथावर आरूढ भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या प्रतिमांची आरती केली व रथयात्रेच्या मार्गिकेला झाडून स्वच्छ केले. 

रथयात्रा हा सनातन धर्म व भारतीय संस्कृतीतील एकमेवाद्वितीय अनुभव आहे.  या उत्सवानिमित्त भगवान जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडून  भक्तांच्या  भेटीसाठी बाहेर येतात. पूर्वी जगन्नाथ पुरी तसेच काही ठिकाणी सीमित असलेला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी जगाच्या विभिन्न भागात पोहोचवला असे राज्यपालांनी सांगितले.

जो इतरांचे दुःख, कष्ट जाणतो त्यालाच 'वैष्णव' असे म्हणतात असे सांगत भक्तीला कृतीची जोड दिल्यास ती ईश्वरीय सेवा होते असे राज्यपाल म्हणाले. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य भक्तीने केल्यास ती सेवा ठरते. कृष्णभक्ती ही गीत, नृत्य साधनेच्या माध्यमातून देखील केली जाते, असेही त्यांनी सांगितले.  

आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या युगात भक्तिभाव विशेष आवश्यक आहे. त्यातूनच मानवी कल्याण साधेल असे त्यांनी सांगितले. श्रील प्रभुपाद हे वयाच्या सत्तराव्या वर्षी अमेरिकेत गेले व त्यांनी जगाला सोपा असा महामंत्र दिला असे सांगून राज्यपालांनी इस्कॉनच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेचा अनुभव मुंबईत दिल्याबद्दल इस्कॉनचे आभार मानले.

रथयात्रा ही भक्ती, शक्ती, प्रेम व करुणेचे प्रतीक आहे. आपण नृत्यसाधनेच्या माध्यमातून कृष्णभक्ती करीत आहोत. नृत्यामुळे आपण भगवान कृष्णाशी जोडून राहिलो असे खासदार हेमा मालिनी यांनी यावेळी सांगितले.

रथयात्रा अंधेरी येथून जुहू येथील इस्कॉन मंदिर येथे समाप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. सूरदास, इस्कॉन जुहूच्या अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव     डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

पुणे-शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील सुमारे ५४ किलोमीटर मार्गाचा विकास

 पुणे-शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील सुमारे ५४ किलोमीटर मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात पहिल्या ३१ किलोमीटरमध्ये सहा पदरी उन्नत महामार्ग, तर स्थानिक वाहतुकीसाठी समांतर चार पदरी रस्ता विकसित केला जाणार आहे.

उन्नत महामार्गाच्या सुरुवातीच्या सात किलोमीटर भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासाचा कालावधी सुमारे दीड ते दोन तासांवरून ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होणार असून, वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर कॉरिडॉर हा सुमारे ५३ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून,

 तळेगाव-चाकण-शिक्रापूर कॉरिडॉर हा सुमारे ५३ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याअंतर्गत सुमारे २६ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि ५३.२ किलोमीटर लांबीचा चार पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. चाकण औद्योगिक परिसर, पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने औद्योगिक, व्यापारी आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.


पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला, औद्योगिक विकासाला, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विस्ताराला व शिक्षणासाठी

  पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला, औद्योगिक विकासाला, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विस्ताराला व शिक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्योन्मुख नियोजन करण्यात येत आहे. सासवड-पुरंदर विमानतळ, वाढती वाहतूक व शहराचा विस्तार विचारात घेऊन पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात ३०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या सायकल मार्गांच्या विकासालाही गती देण्यात येणार असल्याचे श्री. भोसले म्हणाले.

 या प्रकल्पांमध्ये चौपदरी, सहापदरी व उन्नत मार्गांचा समावेश असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लांबीचा उन्नत मार्ग निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच राज्याने उभारलेल्या विविध पायाभूत सुविधांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेगळी ओळख निर्माण केल्याचे मंत्री श्री. भोसले यांनी नमूद केले.


आधुनिक पायाभूत सुविधा राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्थेसाठी आवश्यक

 आधुनिक पायाभूत सुविधा राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्थेसाठी आवश्यक

-         सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणाले की, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असून, बदलत्या हवामानालाही तोंड देऊ शकणारी दर्जेदार कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्ग हा

 नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगून, भूसंपादनातील तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्पही लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी सूचना श्रीमती पवार यांनी केली.

Featured post

Lakshvedhi