‘मिशन ऑरेंज सिटी’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
नागपूर, दि. १८ : मिशन ऑरेंज सिटी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी संत्र्याचे रोप लावत उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी महापौर नीता ठाकरे, आमदार परिणय फुके, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक अतुल पांडे तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मिशन ऑरेंज सिटी हा उपक्रम दैनिक महाराष्ट्र टाईम्स या समूहातर्फे राबविण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
000
No comments:
Post a Comment